Baby food in marathi


7 महिन्याच्या बाळाचा आहार | 7th Month Old Baby Food In Marathi

0

1. 7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता

घरात बाळ आल्यानंतर मोठ्यांचे सल्ले सुरू होतात. साधारण 6 व्या महिन्यापासून बाळाचा आहार सुरू होतो. प्रत्येक महिन्यात बाळाला वेगवेगळा आहार आपण देऊ शकतो. 7 महिन्याच्या बाळाचा आहार (7 Mahinyachya Balacha Aahar) नक्की कसा असावा अथवा 7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता (7 Month Baby Diet Chart Marathi) बाळाच्या आईला माहीत असायला हवा. गरोदरपणात तुम्ही याचा अभ्यास करून ठेऊ शकता. गरोदरपणात वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांमध्येही याविषयी माहिती असते. 7 महिन्याच्या बाळाचा आहार (7 Month Baby Food Chart In Marathi) सुरू करताना त्यामध्ये नक्की कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा (7 Month Baby Food In Marathi) हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचीच योग्य आणि इत्यंभूत माहिती या लेखातून आम्ही घेऊन आलो आहोत. बाळाची काळजी प्रत्येक महिन्यात व्यवस्थितच घ्यावी लागते.

Table of Contents

 1. 7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता – 7 Month Old Baby Diet Chart In Marathi
 2. 7 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ – Best Food For 7 Month Old Baby In Marathi
 3. 7 महिन्यांच्या बाळाने किती खायला हवे – How Much A Baby Should Eat At This Age Marathi
 4. 7 व्या महिन्यात बाळासाठी मुख्य पोषक तत्वे कोणती आहेत – What Are The Most Important Nutrients In A Baby’s Diet?
 5. 7 महिन्यांच्या बाळासाठी होममेड बेबी फूड रेसिपी – Homemade Baby Food Recipes For 7 Month Old Baby
 6. 7 महिन्यांच्या बाळाला हे देऊ नये – Which Food To Avoid For Baby In Marathi
 7. प्रश्नोत्तरे (FAQ)

7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता – 7 Month Old Baby Diet Chart In Marathi

7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता (7 Month Old Baby Diet Chart In Marathi)

प्रत्येक बाळाचा शारीरिक विकास हा वेगळा असतो. साधारण सातव्या महिन्यात बाळ आधाराने बसायला शिकलेले असते आणि आपल्या हाताने खेळणी उचलण्याइतकी ताकद त्याच्यामध्ये आलेली असते. बाळाने मान सावरायला शिकलेले असते आणि हळूहळू पुढेदेखील सरकत असते. बाळ सातव्या महिन्यात अन्न चावायला शिकत असते. कारण काही बाळांना दातही येणे सुरू झालेले असते. तर काही बाळ एक एक अक्षरही उच्चारू लागतात. त्यामुळे बाळाचा अधिक विकास होण्यासाठी 7 महिन्याच्या बाळाचा आहार (7 Month Old Baby Diet Chart In Marathi) महत्त्वाचा आहे. त्यासाठी योग्य आहार तक्ता घ्या जाणून. 

साधारणपणे सात महिन्याचे बाळ हे तीन वेळा घन पदार्थ आणि दोन वेळा स्नॅक्स खातात. तर सकाळी उठल्यावर आणि मध्ये मध्ये स्तनपान करतात. त्यानुसार हा तक्ता

दिवससकाळी उठल्यानंतरबाळाचा नाश्तादुपारचे जेवणसंध्याकाळचा नाश्तारात्रीचे जेवण
सोमवारस्तनपाननाचणीची लापशीतूप भात (मऊ भात)फळांचा रस धान्याची लापशी
मंगळवारस्तनपानफळांची प्युरी (सफरचंद, पेर)दलियाडाळीचे पाणीमऊ भात (तूप वा डाळीचे पाणी घालून)
बुधवारस्तनपानमऊ मुगाची खिचडीउकडलेल्या भाज्यांचे सूपस्तनपान तांदळाची खीर
गुरूवारस्तनपानगव्हाच्या पिठाची लापशीमाशाची प्युरीगाजराची खीर नाचणी लापशी
शुक्रवारस्तनपानइडलीमऊ खिचडीसफरचंद प्युरीमऊ मुगाची खिचडी
शनिवारस्तनपानभाज्यांचे सूपदलियाकेळंमऊ भात
रविवारस्तनपानदही भातलापशीपेर प्युरीतांदळाची लापशी 
7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता । 7 Month Old Baby Diet Chart In Marathi

7 महिन्याचे बाळ साधारणतः पाव वाटी लापशी खाते. बाळाच्या मागणीनुसार तुम्ही हे त्याला भरवू शकता. मात्र यासह आईचे दुधही गरजेचे आहे हे लक्षात ठेवा. 

7 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ – Best Food For 7 Month Old Baby In Marathi

7 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ (Best Food For 7 Month Old Baby In Marathi)

बाळ जेव्हा 7 महिन्याचे होते तेव्हा त्याची शारीरिक प्रगती अगदी वेगाने होऊ लागते. तसंच त्याची शारीरिक हालचालही जास्त प्रमाणात होत असते. बाळाला दात येण्याचा हा काळ असतो. त्यामुळे बाळाचे योग्य पोषण होणे आवश्यक आहे. यासाठी 7 महिन्यांच्या बाळासाठी सर्वोत्तम पदार्थ कोणते (Best Food For 7 Month Old Baby In Marathi) हे जाणून घ्यायला हवेत. 

Baby Chakra

NATURAL VAPOUR PATCH FOR BABIES & KIDS – 5 PATCHES

199

उकडलेल्या भाज्या 

6 व्या महिन्यात अन्नप्राशनाचा विधी झाल्यावर बाळाला अनेक पदार्थ (7 Month Baby Food In Marathi) तुम्ही खायला घालू शकता. त्यापैकी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे उकडलेल्या भाज्या मॅश करून बाळाला त्याचे सूप बनवून देणे. भाज्या वाफवून त्याची प्युरी बनवून बाळाला खायला द्यावी. हे त्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. 

फळांचा रस 

अगदी लहानपणापासूनच म्हणजे अगदी 7 व्या महिन्यापासूनच सफरचंद, पेर, केळी, चिकू, पपई यांच्या फळांच्या रसाची बाळाला चव चाखायला द्यावी. जेणेकरून त्याला योग्य पोषक तत्व मिळतात. बाळाला प्रतिकारशक्ती वाढविण्यासही यामुळे मदत मिळते.

लापशी 

बाळाला उत्तम पोषण मिळावे म्हणून लापशी हा सर्वोत्तम पदार्थ (7 Month Baby Food In Marathi) आहे. गहू, तांदूळ, जव, बाजरी, नाचणी या सर्व पदार्थांची लापशी तुम्ही बाळाला भरवावी. या धान्याची तुम्ही पावडर करून घ्या आणि त्याची लापशी तुम्ही नियमित आपल्या 7 महिन्याच्या बाळाला भरवा. त्याला यामधून पोषक तत्व मिळतात.

खिचडी

तांदूळ, मूग अशा डाळीची मऊ खिचडीदेखील बाळांना द्यावी. खिचडी ही बाळासाठी पौष्टिक असून मोठ्यांच्या अन्नाची त्याला यामुळे ओळख होते. 

मांस

चिकन आणि मटण यामधून बाळाला प्रथिने आणि कार्बोदके मिळतात. त्यामुळे याची प्युरी करून बाळाला अगदी प्रमाणात भरवावे. तसंच अंडे उकडून त्याचे लहान लहान तुकडेही बाळाला तुम्ही भरवू शकता.  

7 महिन्यांच्या बाळाने किती खायला हवे – How Much A Baby Should Eat At This Age Marathi

बाळाने खाणे चालू करून एकच महिना लोटलेला असतो. साधारणपणे 7 महिन्याचे बाळ हे दिवसातून स्तनपान दोन ते तीन वेळा, 2 वेळा स्नॅक्स आणि 3 वेळा घन पदार्थ खाऊ शकते. बाळाला तुम्ही अति प्रमाणात खायला देऊ नका. बाळाला आपल्याला काय होत आहे हे या वयात व्यक्त करता येत नाही. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने प्रमाणात त्याला वर तक्त्यात दिलेले पदार्थ तुम्ही खायला देऊ शकता. तसंच सातव्या महिन्यात बाळाला फिल्टरचे पाणी अथवा घरात उकळून थंड केलेले पाणीही तुम्ही देऊ शकता. 7 महिन्यांच्या बाळाने किती खायला हवे (How Much A Baby Should Eat At This Age Marathi) असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही याचा संदर्भ घेऊ शकता. 7 महिन्याच्या बाळाचा आहार तुम्हाला व्यवस्थितच द्यायला हवा. 

7 व्या महिन्यात बाळासाठी मुख्य पोषक तत्वे कोणती आहेत – What Are The Most Important Nutrients In A Baby’s Diet?

बाळाचे पोषण योग्य होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण वयाच्या सहा महिन्यानंतर बाळाला केवळ आईचे दूध पुरेसे ठरत नाही. त्यामुळे वरचे अन्न सुरू करावे लागते. उशिरा अन्न सुरू केल्यास कुपोषणाला कारणीभूत ठरू शकते. याच काळात बाळाला दातही येत असतात. त्यामुळे त्याच्या शरीराच्या वाढीसाठी मुख्य पोषक तत्वे द्यायला हवीत. यासाठी रोज नाचणीचे दूध, गूळ घातलेली खीर अर्थात लापशी द्यावी, ज्यामधून बाळाला कॅल्शियम मिळते. तुम्ही तांदळाची खीरही करून देऊ शकता. याशिवाय तुम्ही तांदूळ, हरभरा डाळ, शेंगदाणे हे सर्व भाजून भरडून ठेऊन त्याची लापशी देऊ शकता. जेणेकरून बाळाला योग्य पोषण मिळते. 

7 व्या महिन्यात बाळाला गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या हे सर्व शिजवून आणि वाफवून त्याचे सूप बनवून द्यावे. यामुळे जीवनसत्वयुक्त आणि खनिजयुक्त पोषक तत्वे बाळाच्या पोटामध्ये जाण्यास मदत मिळते. तसंच बाळाला रोज थोडं थोडं तूपही द्यावं. याचा बाळाच्या पोषणासाठी चांगला फायदा होतो.  वरणभात (मऊ शिजलेला) किंवा मुगातांदळाची मऊ शिजलेली खिचडी, उकडलेला मऊ बटाटा, पोळी दुधात कुस्करून, केळं, आंबा, पेरू असे कोणतेही फळ, उकडलेल्या अंड्याचा पिवळा भाग, मटणाचे सूप, कोणत्याही पालेभाजीचे सूप असे सर्व पदार्थ (7 Month Baby Food In Marathi) बाळाच्या पोषणासाठी उत्तम ठरतात.  

7 महिन्यांच्या बाळासाठी होममेड बेबी फूड रेसिपी – Homemade Baby Food Recipes For 7 Month Old Baby

बाळासाठी आईने घरीच असे काही पदार्थ (7 Month Baby Food Recipes In Marathi) बनवावेत ज्यामुळे त्याचे योग्य पोषण मिळण्यास मदत होते. त्यासाठी अगदी सोप्या काही रेसिपी आम्ही तुम्हाला देत आहोत. 

नाचणीची लापशी 

Ragi Lapshi

साहित्य

 • 1 कप नाचणीचे पिठ 
 • 1 चमचा तूप
 • आवश्यकतेप्रमाणे पाणी 

बनविण्याची पद्धत 

 • एका भांड्यात नाचणीचे पीठ आणि पाणी घालून पेस्ट तयार करा आणि मंद आचेवर उकळी येईपर्यंत ठेवा 
 • शिजल्यावर त्यात एक चमचा तूप सोडा आणि मग थंड करून आपल्या बाळाला खायला द्या

सफरचंदाचा रस 

Apple Puree

साहित्य 

 • 1 सफरचंद 

बनविण्याची पद्धत 

 • सफरचंदाचे साल काढून टाका
 • त्यानंतर एका भांड्यात सफरचंद उकडून घ्या 
 • मॅश करून त्याची बारीक पेस्ट करा आणि मग गाळून बाळाला भरवा 

गव्हाच्या पिठाचा पॅनकेक 

Wheat Pancake

साहित्य

 • 1 कप गव्हाचे पिठ
 • पाव कप गुळाचा रस 
 • आवश्यकतेप्रमाणे पाणी 
 • 1 चमचा बडिशेप

बनविण्याची पद्धत 

 • गव्हाच्या पिठामध्ये गुळाचा रस मिक्स करा
 • थोडे पाणी घाला आणि सरसरीत पेस्ट बनवून घ्या 
 • त्यात बडिशेप घाला, तुम्हाला हवं तर बडिशेप पावडरही मिक्स करू शकता
 • हे मिश्रण रात्रभर तसंच ठेवा
 • सकाळी तव्याला थोडं तूप लावा आणि याचे डोसे घाला
 • दोन्ही बाजूंनी भाजून घ्या आणि पॅनकेक्स तयार. बाळाला लहान लहान तुकडे भरवा 

मुगाच्या डाळीची खिचडी 

Moong Khichdi

साहित्य

 • अर्धा कप हिरव्या मुगाची डाळ
 • अर्धा कप तांदूळ
 • अर्धा चमचा हळद
 • अर्धा चमचा जिरे
 • 1 चमचा तूप
 • पाऊण कप पाणी 

बनविण्याची पद्धत

 • डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि अर्धा तास पाण्यात भिजत घाला
 • त्यानंतर पाणी काढून टाका आणि त्यात हळद आणि जिरे घाला
 • हे प्रेशर कुकरमध्ये पाणी घालून शिजवून घ्या
 • शिजल्यावर मिक्सरमध्ये एकदा फिरवा आणि मग बाळाला भरवा 

धान्यांची लापशी 

Lapshi

साहित्य

 • सर्व धान्य एकत्र करून तयार केलेली धान्यांची पूड
 • अर्धा कप पाणी
 • स्तनपानाचे दूध अथवा फॉर्म्युला दूध अर्धा कप

बनविण्याची पद्धत 

 • एका भांड्यामध्ये धान्याचे पीठ घ्या आणि त्यात पाणी घालून गुठळी राहणार नाही असे व्यवस्थित मिक्स करून घ्या 
 • त्यानंतर मंद गॅसवर हे शिजू द्या
 • उकळल्यावर त्यात दूध घाला
 • तुम्हाला हवं तर एखाद्या फळाची प्युरीही यात तुम्ही मिक्स करून घेऊ शकता 

हे पदार्थ तुम्ही घरच्या घरी बनवून आपल्या 7 महिन्याच्या बाळाचा आहार करत असल्यास, समाविष्ट करून घेऊ शकता.  

7 महिन्यांच्या बाळाला हे देऊ नये – Which Food To Avoid For Baby In Marathi

 • बाळाला वरच्या आहाराची सुरूवात करताना एका वेळी एकच पदार्थ सुरू करावा. लगेच एकाच दिवशी दुसरा पदार्थ देणे टाळावे. उदा. भाताची पेज आज दिल्यास, पुढचे साधारण 3-4 दिवस भाताची पेजच द्यावी. त्यानंतर दुसऱ्या एखाद्या पदार्थाची चव बाळाला द्यावी 
 • बाळ साधारण एक वर्षाचे होईपर्यंत कोणत्याही पदार्थामध्ये मीठ वा साखर घालू नये. बाळाला तुम्ही जे पदार्थ देता त्याचीच चव माहीत असते. त्यामुळे मीठ आणि साखर हे पदार्थ नाही घातले तरीही बाळ इतर पदार्थ खाणारच हे लक्षात ठेवा 
 • एखादा पदार्थ खाताना बाळाला त्रास झाला तर थोडे दिवस तो पदार्थ देणे टाळावे 
 • बाळाला खूप थंड किंवा खूप गरम पदार्थ देऊ नयेत. कोमट करूनच द्यावेत 
 • पाणी अथवा दूध सहसा बाटलीतून देऊ नये
 • वरचे दूध देणे सहसा टाळावे
 • शेंगदाणे, काजू अथवा सुकामेवा देऊ नये. असे पदार्थ बाळाच्या घशात अडकण्याची भीती असते
 • साधारण एक वर्षापर्यंत मध देणेही टाळा 
 • रेडीमेड फूड अथवा बाजारात मिळणाऱ्या कोणत्याही पावडरींचा उपयोग बाळासाठी करून घेऊ नका

प्रश्नोत्तरे (FAQ)

प्रश्नः सात महिन्याच्या बाळाच्या विकासाचे काय टप्पे आहेत?
उत्तरः सात महिन्याचे बाळ साधारणतः बसू शकते. तसंच हातात खेळणी धरू शकते आणि फेकूही शकते. आपल्या नावाला प्रतिसादही बाळ देते. याशिवाय या काळात बाळाला दात येत असतात. 

प्रश्नः सात महिन्याच्या बाळाची उंची आणि वजन साधारण किती असावे?
उत्तरः प्रत्येक बाळ हे वेगळे असते. पण साधारण बाळाचे वजन जर मुलगा असेल तर हे साडेसहा किलो ते दहा किलो इथपर्यंत असावे. यापेक्षा कमी अथवा यापेक्षा अधिक असू नये. तर बाळाची उंची ही 72 सेमी इतकी वाढते. तर मुलगी असल्यास तिचे वजन साधारणतः सहा ते नऊ किलो इतके असते आणि उंची ही 68 सेमी इतकी असते. 

प्रश्नः सात महिन्याच्या बाळाची झोप किती तास असावी?
उत्तरः सात महिन्याचे बाळ हे साधारणतः 10 ते 14 तास झोपते. त्याला पुरेशी झोप मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे इतकी झोप तरी हवीच. 

निष्कर्षः 7 महिन्याच्या बाळाचा आहार (7 mahinyachya balacha aahar) आपण या लेखातून जाणून घेतला आहे. तसंच आम्ही तुम्हाला 7 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता (7 month baby diet chart marathi) देखील दिला आहे. यामध्ये (7 month baby food chart in marathi) बाळाला 7 व्या महिन्यात काय खायला पदार्थ हवेत (7 month baby food in marathi) आणि त्या पदार्थांच्या रेसिपीचा (7 month baby food recipes in marathi) समावेशही आम्ही केला आहे.  

5 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता | 5 month Old baby food Chart In Marathi

0

1. तुमचे 5 महिन्याचे बाळ पदार्थ खाण्यासाठी तयार आहे का?

तुमचे बाळ 5 महिन्याचे झाले आहे का? तुम्हाला त्याला आहार सुरू करायचा आहे का? तुम्हाला यासाठी काही टिप्स आणि काळजी घ्यावी लागेल. कारण सहसा 6 महिन्यांपर्यंत बाळ हे आईच्या दुधावर असते. आईचे दूध बाळाच्या वाढीसाठी गरजेचे ठरते. त्यामुळे  5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असावा अथवा 5 महिन्याच्या बाळाला आहार द्यावा की नाही याबाबत अनेक पालकांच्या मनात शंका असते. बरेच पालक अजून एक महिना थांबण्याचा सल्लाही देतात. तर काही जण तुम्हाला 5 व्या महिन्यापासून आहार द्यायला काहीच हरकत नसल्याचा सल्ला देतात. पण आहार दिला तरीही 6 महिन्याच्या बाळाला आईचे दूध हे द्यायलाच लागते.  5 महिन्याच्या बाळाचा आहार नक्की काय असावा आणि त्यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा, बाळाचा आहार तक्ता काय आहे याबाबत काही महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. पण त्याआधी तुम्ही तुमच्या बाळाच्या विकासासाठी त्याला आहार सुरू करणे योग्य आहे की नाही याची माहिती त्याच्या डॉक्टरांनाही विचारून घ्यावी. त्याआधी तुमचे 5 महिन्याचे बाळ पदार्थ खाण्यासाठी तयार आहे का? हेदेखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Table of Contents

 1. तुमचे 5 महिन्याचे बाळ पदार्थ खाण्यासाठी तयार आहे का?
 2. 5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असायला हवा
 3. 5 महिन्यांच्या बाळाचा आहार असा असावा – 5 Mahinyachya Balacha Aahar Marathi
 4. 5 महिन्याच्या बाळाला आहार कसा भरवावा
 5. FAQ’s – 5 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता

तुमचे 5 महिन्याचे बाळ पदार्थ खाण्यासाठी तयार आहे का?

तुमचे 5 महिन्याचे बाळ पदार्थ खाण्यासाठी तयार आहे का?

तुमचे 5 महिन्याचे बाळ पदार्थ खाण्यासाठी तयार आहे का? हे तुम्हाला कसं समजणार असाही प्रश्न तुमच्या डोक्यात येईल. पण काही लक्षणे आहेत, जी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सोपे करून देते. तुमचे बाळ पाचव्या महिन्यात आहार घ्यायला तयार झाले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काही लक्षणे आम्ही सांगत आहोत ती तुम्ही नक्की जाणून घ्या –

 • आईच्या अंगावरील दूध पिऊन झाल्यानंतरही तुमचे बाळ जर असमाधानकारक असेल आणि भूकेसाठी अधिक रडत असेल 
 • तुमच्या बाळाचे डोकं सावरले असेल आणि कोणाच्याही मदतशिवाय बसण्याचा प्रयत्न करत असेल अथवा बसू शकत असेल
 • तुमच्या बाळाचे तोंड चमचा तोंडात घेण्याइतके जर मोठे उघडत असेल आणि जीभ बाहेर व्यवस्थित आपणहून बाळाला काढता येत असेल
 • तुम्ही जेवत असताना तुमचे बाळ जर तुमच्या ताटातील पदार्थांकडे टक लाऊन पाहात असेल आणि त्यातील पदार्थ घेण्यासाठी पुढे येत असेल 

ही लक्षणे जर तुमच्या 5 महिन्याच्या लहान बाळामध्ये दिसून येत असतील तर त्याला अधिक आहाराची गरज भासत आहे हे वेळीच लक्षात घ्या. पण आहाराच्या बदल्यात तुम्ही आईच्या अंगावरील दूध पाजणे मात्र बंद करू नका. आहार चालू केला तरीही तुम्ही किमान सहा महिने बाळाला दूध द्यायला हवे. तसंच बाळाला घरगुती खाणेच द्या. नैसर्गिक खाण्यामुळे बाळाचा आहार सकस होतो. 

5 महिन्याच्या बाळासाठी कोणताही सेट आहार नाही. तुमच्या बाळाला कोणते अन्न पचते यावर तुम्हाला सतत चाचपणी करत राहावी लागते हे लक्षात ठेवा. पण तरीही साधारणतः आहारामध्ये काय असायला हवे हेदेखील आपण जाणून घेऊ शकतो.

5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असायला हवा

5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असायला हवा

5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असायला हवा किंवा त्याला सुरूवातीला कोणते पदार्थ भरवायला हवेत हे पालकांना माहिती नसते. आम्ही तुम्हाला 5 महिन्याच्या बाळाचा आहार काय असायला हवा यासाठी एक यादी देत आहोत. ज्यामुळे बाळाला आहार देण्यासाठी पहिले तुम्ही कोणते पदार्थ वापरू शकता, बाळाचा आहार तक्ता बनविण्यासाठी हे नमूद करण्यात आले आहे. 

 • स्तनपान वा फॉर्म्युला दूध 
 • मॅश्ड केळे, मॅश्ड अव्हाकाडो, पेर सॉस आणि सफरचंदाची प्युरे (सफरचंदाचा जाड रस)
 • शिजलेले अथवा उकडलेल्या गाजराचा गाळलेला रस, वाटण्याचा रस, रताळ्याचा वा भोपळ्याचा रस 
 • कडधान्याचे सूप अथवा डाळींचे पाणी, उकडलेल्या डाळींचे पाणी (प्राधान्याने मूगडाळीचे पाणी)
 • तांदळाचे पाणी जे तांदूळ शिजल्यानंतर उरते 
 • साबुदाण्याचे पाणी 
 • धान्याचे (एका) सेरेलॅक, साधारणतः तांदूळ अथवा ओटमील या पदार्थांपासून सुरूवात केल्यास, बाळाला त्रास होत नाही 

या पदार्थांनी बाळाला सहसा त्रास होत नाही. त्यामुळे आहाराच सुरू करायचा असेल तर तुम्ही या पदार्थांचा समावेश करून घ्यायला काहीच हरकत नाही. पण तत्पूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या 

 वाचा – 6 महिन्याच्या बाळाचा आहार

5 महिन्यांच्या बाळाचा आहार असा असावा – 5 Mahinyachya Balacha Aahar Marathi

5 महिन्याच्या बाळाचा आहार काय हे आम्ही तुम्हाला सांगितला पण हा आहार नेमका कसा बनवायचा हेदेखील माहीत असायला हवे. 5 महिन्याच्या बाळाच्या आहारासाठी खास रेसिपी आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्ही तुमच्या बाळासाठी अशा पद्धतीने आहार बनवा आणि सकस आहार द्या. आहार बनविण्याची सोपी पद्धत आम्ही येथे खाली देत आहोत. 

सेरेलॅकची रेसिपी 5 महिन्यांच्या बाळासाठी उत्तम आहार असू शकतो

Cerelac Recipe – बाजारामध्ये तयार सेरेलॅक मिळते. मात्र त्यापेक्षा तुम्ही घरात बनविलेले सेरेलॅक बाळासाठी अधिक पौष्टिक ठरते. 

 • तांदूळ भाजून घ्या आणि नंतर मिक्सरमधून वाटून त्याचे पीठ तयार करा
 • गायीचे दूध अथवा ब्रेस्टमिल्क घेऊन ते तापवा आणि त्यानंतर त्यात तांदळाची पावडर मिक्स करून व्यवस्थित मंद आचेवर घोटून घ्या
 • हे पीठ व्यवस्थित शिजू द्या. ही पेस्ट अगदी पातळ वा अगदी घट्ट नसावी याची काळजी घ्या. त्यानंतर कोमट करून बाळाला हळूहळू भरवा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाऐवजी ओटमील्सचाही वापर करू शकता. यामध्ये अजिबात साखर घालू नका हे नेहमी लक्षात ठेवा

सफरचंदाचा वा पेरचा रस चे सेवन 5 महिन्यांच्या बाळासाठी पौष्टिक आहार असू शकतो

Apple Sauce or Pear Juice – सफरचंद अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच फायदेशीर ठरते. बाळासाठी आहार चालू करायचा असेल तर सफरचंदासारखा दुसरा उत्तम पदार्थ नाही

 • सफरचंद वा पेराचे साल काढून व्यवस्थित फोडी कापून घ्या 
 • एका भांड्यात पाणी घ्या आणि शिजवा 
 • शिजवून झाल्यावर सफरचंद वा पेर व्यवस्थित मॅश करा आणि त्याचा रस गाळून घ्या. जेणेकरून बाळाच्या घशात काहीही अडकणार नाही
 • त्यानंतरच आपल्या बाळाला हे भरवा 

मॅश्ड केळे चे सेवन 5 महिन्यांच्या बाळासाठी पौष्टिक आहार असू शकतो

Mashed Banana – केळे हे पचनशक्तीसाठी चांगले समजण्यात येते. तसंच केळं पचायला सोपे असते. त्यामुळे 5 महिन्याच्या बाळाचा आहार सुरू करायचा असेल तर केळं नक्कीच योग्य आहे Mashed Bananaकेळे हे पचनशक्तीसाठी चांगले समजण्यात येते. तसंच केळं पचायला सोपे असते. त्यामुळे 5 महिन्याच्या बाळाचा आहार सुरू करायचा असेल तर केळं नक्कीच योग्य आहे 

 • केळ्याचे साल काढून घ्या. अजिबात शिजवू नका 
 • एका भांड्यात केळं कुस्करून घ्या अथवा ग्राईंडरमध्ये ब्लेंड करा
 • थोडंसं दूध त्यात मिक्स करून 5 महिन्याच्या बाळाला भरवा

केळं देणार असलात तर तुम्ही सेरेलॅक नाही दिलंत तरी चालेल

उकडलेला वाटाणा 5 महिन्यांच्या बाळासाठी उत्तम आहार असू शकतो

वाटाणादेखील बाळाच्या आहारासाठी उत्तम मानला जातो. पण कच्चा वाटणा राहणार नाही याची काळजी घ्या. 

 • वाटाणा व्यवस्थित निवडून घ्या. त्यात कीड नाही ना हे तपासून घ्या
 • एका भांड्यात पाणी घ्या त्यात वाटाणा उकडू द्या
 • वाटाणा पूर्ण शिजल्यावर त्याची प्युरे करा ज्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही हे तपासून घ्या 
 • हे मिश्रण बाळाला भरवा 

हे चार सोपे आणि घरगुती पदार्थ तुम्ही  5 महिन्याच्या बाळाचा आहार सुरू करायचा असेल तर नक्कीच ट्राय करू शकता. 

वाचा – 9 महिन्याच्या बाळाचा आहार

5 महिन्याच्या बाळाला आहार कसा भरवावा

5 महिन्याच्या बाळाला कसा आहार भरवायचा याच्या पण काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही पहिल्यांदाच आई – बाबा झाले असाल तर तुम्हाला या टिप्स नक्कीच कामाला येतील. 

 • आपल्या बाळाला कोणत्याही पदार्थाची अलर्जी तर होत नाही ना हे आधी तपासून पाहा. त्यासाठी कमी प्रमाणात आहार घ्या आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या 
 • पहिला घास संपल्याशिवाय बाळाला भरविण्याची घाई करू नका. बाळाच्या कलाकलाने भरवा. बाळाला अन्नाची व्यवस्थित चव घेऊ द्या 
 • बाळाला भरविण्यासाठी बेबी कटलरीचाच वापर करा. तसंच तुम्ही तुमच्या बोटांचा वापर करा. बाळाला त्रास होत नाही ना याची काळजी घ्या
 • आहार चालू करताना बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला अजिबात विसरू नका. कारण बाळाला बोलता येत नाही त्यामुळे त्याला काही होत असेल तर त्याला सांगता येणार नाही. एकाच दिवशी जास्त प्रमाणात खायला देऊ नका. प्रमाण समजून घेऊन मगच द्या 

FAQ’s – 5 महिन्याच्या बाळाचा आहार तक्ता

प्रश्न – बाळाला अचानक आहार द्यायला सुरूवात केल्यावर काही त्रास होतो का?
उत्तर – काही बाळांना शी चा त्रास होऊ शकतो. पण तुम्ही प्रमाणात खाणं सुरू केल्यास, बाळांना त्रास होत नाही. तसंच या पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले, मीठ मिक्स करू नये अन्यथा बाळाला त्रास होऊ शकतो. 

प्रश्न – 5 महिन्याच्या बाळाला आहार देणे योग्य की अयोग्य?
उत्तर – समाजात वेगवेगळे समज आहेत. पण बाळाला आईचे दूध पुरत नसेल तर तुम्ही अत्यंत सौम्य आहार बाळाला सुरू करू शकता. 

प्रश्न – 5 महिन्याच्या बाळाला आहार नको आहे हे कसे समजावे?
उत्तर – तुम्ही तयार केलेला आहार बाळ जिभेवरून फेकून देत असेल अथवा तोंड फिरवत असेल अथवा आहार घेतल्यानंतर उलटी करत असेल तर बाळाला अजूनही केवळ दुधावरच ठेवणे योग्य आहे समजावे. असे झाल्यास बाळाला आहार देऊ नये. 

Disclaimer

5 महिन्याच्या बाळाचा आहार सुरू करायचा असेल तर नक्की कोणते पदार्थ हवेत अथवा कोणती काळजी घ्यायला हवी याबाबत आम्ही तुम्हाला योग्य माहिती दिली आहे. मात्र लगेच पदार्थ देणे सुरू करू नका. तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तुमचे बाळ सुदृढ राहावे आणि व्यवस्थित राहावे यासाठी योग्य सल्ला घ्या. 

Proper nutrition of a child is a guarantee of health - Children's City Polyclinic No.

1

Every parent wants his child to grow up healthy, smart, happy.

From childhood, we must teach our children to choose from the variety of foods that are really good for health. The nutrition of children is somewhat different from the nutrition of adults. If the child's nutrition system is built correctly, then the child develops normally, both physically and mentally.

Make your family's way of life by introducing your child to proper nutrition every day. There is no need to arrange constant lectures from this on the topic of what is useful and what is harmful. By actively communicating with your child, setting an example, you instill good eating habits.

Only good things should be spoken at the table. The situation should help the child to relax, then the appetite will be good and the mood will be friendly. Children can help you with serving and decorating dishes. When serving vegetables and fruits, ask the children what vitamins and minerals they contain and why they are so useful. In order to organize the proper nutrition of the child, you need to follow several important rules:

Rule 1

Food should be varied.

This is an important condition for the child's body to receive all the substances necessary for growth and development. Every day, the child's menu should include: fruits and vegetables; meat and fish; milk and dairy products; grain products (bread, cereals, cereals). Insufficiency or excess of food consumed by a child can adversely affect the activity of the gastrointestinal tract, contribute to metabolic disorders, increase overweight (even to various degrees of obesity) or lead to malnutrition.

If the child refuses, there is a healthy dish, offer him to experiment and make the dish unusual.

So, with the help of dried fruits and nuts, you can put a funny face on porridge, use ketchup and greens to draw a pattern on scrambled eggs, put mashed potatoes on a plate in the form of a snowman figure, etc.

What should not be used in children's nutrition:

 1. Offal, except liver, tongue, heart; blood, liver, raw smoked sausages.
 2. Deep-fried foods and culinary products, chips.
 3. Curds, condensed milk with vegetable fats.
 4. Koumiss and fermented milk products containing ethanol (more than 0.5%).
 5. Cream confectionery containing vegetable protein.
 6. First and second courses based on fast food concentrates.
 7. Vinegar, mustard, horseradish, hot peppers and other hot spices and food products containing them, including hot sauces, ketchups, mayonnaises and mayonnaise sauces.
 8. Pickled vegetables and fruits.
 9. Natural coffee and carbonated drinks, apricot kernels, peanuts.
 10. Products, including confectionery, containing alcohol.
 11. Food products containing a large amount of food additives in their composition (information is indicated by the manufacturer on consumer packaging).
 12. Dry concentrates for cooking first and second courses (soups, Dosherak vermicelli, cereals).

Rule 2

The child should eat regularly.

Compliance with the diet of children is of great importance for the absorption of nutrients by the body. Preschool children are recommended to eat 4-5 times a day, every 3 hours, at the same time, distributing the diet as follows: breakfast - 25%, lunch - 35%, afternoon snack - 15%, dinner - 25% . At school age, it is advisable to have four meals a day, every 4 hours with an even distribution of the daily ration: breakfast - 25%, second breakfast - 20%, lunch - 35%, dinner - 20%.

Try to stop snacking and teach your child to eat only at the table. If this still doesn't work, offer fruit, biscuits, juice for a snack - food that will help drown out hunger, but will not ruin your appetite.

Proper organization of meals at school in the form of hot school breakfasts and lunches is an important health-improving measure for student children in extended day groups, whose diet should be 50-70% of the daily norm, which, unfortunately, parents do not have enough are paying attention. Eating sandwiches, pizza, chips, chocolate bars is harmful because - this food is inferior in composition and also irritates the stomach, contributing to the development of gastritis.

Rule 3

A child's diet should replenish his daily energy expenditure.

If your child is overweight, limit the amount of sweets and high-calorie desserts, empty the refrigerator. Put a bowl of fruit on the table, a plate of whole grain bread. Children can eat fruits without any restrictions, it is almost impossible to overeat them, and they are very useful. With a lack of any mineral substance or vitamin, the child himself will ask for the apple or even greens he needs.

Try to get your child involved in sports, take walks together, even if little by little, but regularly.

Thus, building proper nutrition for children requires taking into account the characteristics of the child's body, knowledge of certain rules and principles of healthy nutrition.

The material was prepared by the editorial and publishing department of GBUZ JSC "CMP" - 2020

The diet in the kindergarten is formed depending on the age of the child. These are two age categories: children under 3 years old, and from 3 to 7 years old. The list of dishes that children will eat is usually made up 2 weeks in advance, taking into account the seasons.

Organization of food for children in a preschool institution should be combined with proper nutrition of the child in the family. This requires a clear continuity between them. It is necessary to strive to ensure that food outside the preschool educational institution complements the diet received in an organized team. To this end, we publish an approximate ten-day menu (for 2 weeks of a child's stay in preschool). On weekends and holidays, the child’s diet in terms of a set of products and nutritional value should be as close as possible to the diet he receives in preschool.

Website menu

Learn more